Rabi Seed Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Seed Demand : रब्बी हंगामासाठी १ लाख १५ हजार क्विंटलवर बियाण्यांची मागणी

Rabi Season Update : परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ४० हजार ९७७ हेक्टर आहे. २०२० ते २०२२ या तीन वर्षाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात सरासरी ५३ हजार ८१३ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी विविध पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी परभणी जिल्ह्यासाठी ५७ हजार ३६३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यासाठी ५७ हजार ६६८ क्विंटल अशा दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण १ लाख १५ हजार क्विंटल बियाण्याची मागणी महाबीज व खासगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ४० हजार ९७७ हेक्टर आहे. २०२० ते २०२२ या तीन वर्षाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात सरासरी ५३ हजार ८१३ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. जिल्ह्यात यंदा २ लाख ८७ हजार २०० हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. प्रस्तावित क्षेत्रानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे २९ हजार ७१८ क्विंटल व खासगी कंपन्यांकडे २६ हजार ६४५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्यात ‘महाबीज’कडील २७ हजार ५९० क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. ज्वारीचे १ हजार ९१९ क्विंटल, गव्हाचे १२ हजार क्विंटल, मक्याचे २५५ क्विंटल, हरभऱ्याचे ४३ हजार ३५ क्विंटल, करडईच्या ८८ क्विंटल, सूर्यफुलाच्या ३० क्विंटल, इतर पिकांच्या ३६ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये १ लाख ८२ हजार १५० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. जिल्ह्यात २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या रब्बी हंगामात सरासरी ५८ हजार ७५६ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. जिल्ह्यात यंदा १ लाख ८० हजार हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. प्रस्तावित क्षेत्रानुसार महाबीजकडे ७ हजार ८६० क्विंटल व खासगी कंपन्यांकडे ४९ हजार ८०८ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्यात ज्वारीचे ५८७ क्विंटल, गव्हाचे १५ हजार क्विंटल, मक्याचे १३६ क्विंटल, हरभऱ्याचे ४१ हजार ६६७ क्विंटल, करडईच्या १०६ क्विंटल, सूर्यफुलाच्या ४० क्विंटल, इतर पिकांच्या ९० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी दिली.

प्रस्तावित पेरणी क्षेत्र

परभणी जिल्हा ः त्यात ज्वारी १ लाख १ हजार हेक्टर, गहू ३० हजार हेक्टर, मका १ हजार ७०० हेक्टर, हरभरा १ लाख ५१ हजार हेक्टर, करडई १ हजार ९५० हेक्टर, सूर्यफूल १ हजार हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

हिंगोली जिल्हा ः त्यात ज्वारी ८ हजार १६२ हेक्टर, गहू ३० हजार हेक्टर, मका ९०९ हेक्टर, हरभरा १ लाख ३८ हजार ८९१ हेक्टर, करडई १ हजार ६३ हेक्टर, सूर्यफूल ४०० हेक्टर, जवस ४ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT