Custard Apple
Custard Apple Agrowon
ताज्या बातम्या

Kalmana APMC : कळमना बाजारात हंगामातील सीताफळाची आवक

टीम ॲग्रोवन

नागपूर : कळमना बाजार समितीत (Kalmana APMC) नव्या हंगामातील सीताफळाची आवक सुरू झाली आहे. बाजारात गुरुवारी (ता. ६) पहिल्यांदाच दोन क्विंटल इतक्या कमी सीताफळांची आवक झाली. त्यानंतर शनिवारी (ता. ८) वीस क्विंटलवर ती पोचली. सीताफळाचे दर (Cilantro Rate) मात्र ५००० ते ७००० रुपयांवर स्थिर असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

नागपूरलगत असलेल्या मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सीताफळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्याच भागातून सीताफळाची सर्वाधिक आवक कळमना बाजार समिती दरवर्षीच्या हंगामात होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. गुरुवार (ता. ६) पासून कळमना बाजार समितीत सीताफळाची आवक होण्यास सुरवात झाली आहे.

सध्या आवक कमी असली तरी येत्या काळात ती वाढण्याची शक्यता आहे. ५००० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दराने सीताफळाचे व्यवहार होत असले तरी किरकोळ बाजारात मात्र सीताफळाचे दर प्रति किलो १०० ते १५० रुपये असे दर्जानुसार आहेत. बाजारात मेथीचे दरही तेजीत असून गेल्या आठवड्यात सात हजार ते नऊ हजार रुपये दराने मेथीचे व्यवहार झाले.

या आठवड्यात हेच दर आठ हजार ते दहा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. मेथीची आवक ६० क्विंटलवर स्थिर आहे. ढेमसे आवक अवघी सात क्विंटल असून दर सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटलचे आहेत. लिंबूचे दर ३००० ते ४००० रुपये तर आवक पंधरा क्विंटलची होती. बाजारात पालकाची आवक दोनशे क्विंटलच्या आसपास आहे.

पालकाचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात चार हजार ते ४५०० असा दर होता. या आठवड्यात हे दर २००० ते २५०० रुपयांवर आले. बाजारात चवळीच्या भाजीचे दर २००० ते २२०० असून ५० क्विंटलची आवक आहे.

बाजारात मुळ्याची आवक देखील सुरू असून ती ६० क्विंटलच्या घरात आहे. ३००० ते ३५०० रुपये क्विंटलने मुळ्याचे व्यवहार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फणसाची आवक वाढती असून १५० क्विंटलवर पोहोचली आहे. ४००० ते ४५०० रुपयांनी फणसाचे व्यवहार होत आहे. काकडीचे व्यवहार २००० ते २५०० रुपये होत असून आवक २८० क्विंटलची आहे. कारली आवक स्थिर असून ती १३० क्विंटल इतकी आहे. २५०० ते ३५०० असा दर कारलीला मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT