PM Poshan Shakti Agrowon
ताज्या बातम्या

PM Poshan Shakti : शालेय पोषण आहार योजना आता ‘पीएम पोषण शक्ती’

केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारने बदलले नाव

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : शालेय मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता ही योजना ‘पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना’ नावाने ओळखली जाणार आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. केसरकर यांनी या योजनेचे नाव बदलून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी आणि शाळांतील गळती थांबविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. १५ ऑक्टोबर १९९५ पासून ही योजना राज्यात राबविली जाते. केंद्र सरकारने या योजनेत कोणताही बदल न करता केवळ पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना असे नामकरण केले आहे.
राज्य सरकारने मागील वर्षी केंद्र सरकारला पंचवार्षिक आराखडा सादर केला होता. त्यास ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यता दिली होती. त्या वेळी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारने ही योजना पूर्वीच्याच नावाने सुरू ठेवली होती. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर दीपक केसरकर यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर या योजनेचे नाव बदलून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT