Wild Vegetables  Agrowon
ताज्या बातम्या

Wild Vegetables : ‘रानभाजीचा नैसर्गिक वारसा जतन करा’

रानभाजी महोत्सवामार्फत घरोघरी माहिती पोहोचली जावी, हा रानभाजी महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. अशी दुर्मीळ माहिती संकलित करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी मदत करतील.

टीम ॲग्रोवन

पुणे : रानभाज्यांची (Wild Vegetables) माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, रानभाजी महोत्सवामार्फत घरोघरी माहिती पोहोचली जावी, हा रानभाजी महोत्सवाचा (wild Vegetables Festivals) मुख्य उद्देश आहे. अशी दुर्मीळ माहिती संकलित करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी मदत करतील. रानभाज्या व स्थानिक लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर त्याचा फायदा सर्वांना मिळेल, असे मत व वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रवी वानखेडे (Ravi Wankhede)यांनी व्यक्त केले.

गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय, निसर्ग सेवक संस्था आणि वारसा अंजनगाव व वनस्पतिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रानभाजी-२०२२ महोत्सव’ मॉडर्न महाविद्यालयात गुरुवारी (ता.२२) पार पडला. वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रवी वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. संजय खरात, बायोस्फेअरचे अध्यक्ष डॉ. सतीश पुणेकर, डॉ. विनया घाटे, सरपंच नयना भुसारे, पी. ई. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, विभागप्रमुख डॉ. प्राची रावळ आदी या वेळी उपस्थित होते.

बायोस्फेअरचे अध्यक्ष डॉ. सतीश पुणेकर म्हणाले, की आदिवासींच्या संस्कृतीचा नैसर्गिक वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशी प्रदर्शने भरविली जातात. ही संस्कृती नष्ट होऊ नये म्हणून असे प्रयत्न आम्ही सतत करत राहू. या प्रदर्शनासाठी खोसते गाव, शहापूर ठाणे येथील नयना अशोक भुसारे, मंजुळा विलास भुसारे, सुनीता सदाशिव महाले आणि अशोक मारुती भुसारे यांनी विविध रानभाज्या आणल्या होत्या. या सर्व भाज्या कशा करायच्या व त्याचे आर्युर्वेदिक फायदे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

डॉ. विनया घाटे म्हणाल्या, की विविध रानभाज्यांचे वैभव टिकून राहावे. त्यांचे औषधी गुणधर्म सगळ्यांपर्यंत पोहोचवावे म्हणून आम्ही अथक प्रयत्न करत राहणार आहे. रानामध्ये उगविणाऱ्या रानभाज्यांचा परंपरेने होणारा वापर व त्या जपण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांची ओळख नवीन पिढीला व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविले.

: रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, रानभाजी महोत्सवामार्फत घरोघरी माहिती पोहोचली जावी,

हा रानभाजी महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. अशी दुर्मीळ माहिती संकलित करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी मदत करतील. रानभाज्या व स्थानिक लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर त्याचा फायदा सर्वांना मिळेल, असे मत व वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रवी वानखेडे यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT