Ashadi Wari Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत

Palkhi Sohala : शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास माऊलींच्या नगाऱ्यांचे पाठोपाठ माऊलींच्या व स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले.

Team Agrowon

Solapur News : विठ्ठल- वारकरी प्रेमाचे आर्त प्रकट करणारे दिंड्यांमधून गायले जाणारे अभंग...डौलाने फडकणाऱ्या पताका...रथाला डोळ्यांचे पारणे फेडणारी केलेली आकर्षक फुलांची सजावट, प्रचंड रखरखते उन्ह तरीही मुखी ‘माऊली-माऊली’ नामाचा अखंड जयघोष अशा भक्तिमय वातावरणात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता.२३) सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश केला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कुलगुरू डॉ. रजनीश कामत, कुलसचिव डॉ. योगिनी घारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख हिंमतराव जाधव, प्रांताधिकारी नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते.

शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास माऊलींच्या नगाऱ्यांचे पाठोपाठ माऊलींच्या व स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी सातपुते व मोहिते-पाटील यांनी अश्वांचे पूजन केले. दिंड्यापाठोपाठ पावणे अकरा वाजता माऊलींच्या रथांचे आगमन झाले. रथाचे सारथ्य विखे पाटील, मोहिते-पाटील यांनी केले. पालखी सोहळा नातेपुतेत मुक्कामी विसावला.

धर्मपुरी येथे माऊलीच्या पालखी स्वागतासाठी वृक्षारोपण करण्यात आले. आरोग्य विभागाने महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे आज आगमन

संतश्रेष्ठ जगत्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज (ता.२४) अकलूजनजीक सराटी येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT