Team Agrowon
माॅन्सूनच्या पावसाने जिल्ह्यात अद्याप पाऊस पडला नसल्याने भूजल पातळीत वाढ झालेली नाही.
सध्या उजनी धरणात मायनस ३० टक्के पाणीसाठा आहे. वारकर्यांच्या सोयीसाठी नदीत आणि कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी केली जात होती.
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला येणार्या लाखो वारकर्यांच्या सोयीसाठी मंगळवार सायंकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवार-रविवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे
सकाळी नऊ वाजल्यापासून पंधराशे क्युसेकने पाणी सोडले आहे. दुपारनंतर यात वाढ होणार असून जवळपास साडेचार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.
आषाढी वारीपर्यंत म्हणजेच २९ जूनपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. पंढरपुरात पाणी पोहोचल्यानंतर मात्र विसर्ग कमी केला जाणार आहे.
यामुळे वारीसाठी आलेल्या भाविकांची व नदीकाठच्या लोकांची सोय होणार आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील महसूल, जिल्हा परिषद, पेालिस प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.