Sanjay Raut
Sanjay Raut Agrowon
ताज्या बातम्या

Sanjay Raut: राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

Team Agrowon

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत म्हणजेच चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्यामुळे आता राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत वास्तव्य करावे लागणार आहे.

ईडीने रविवारी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना रात्री उशीरा अटक केली. त्यानंतर त्यांना आज (सोमवारी) कोर्टात हजर करण्यात आले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली.

न्यायालयात युक्तीवादा दरम्यान ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी मागितली. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी यात एक रुपयाचीही गुंतवणूक केलेली नाही. पण त्यांना ११२ कोटी रुपये मिळाले असल्याचे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात सांगितले. चौकशीतून हे समोर आले आहे की, यांपैकी १.६ कोटी रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले.

ईडीच्या वकिलांनी न्यायालयात राऊत (Sanjay Raut) यांच्यावर तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आरोप केला. ईडीने रविवारी रात्री उशिरा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT