Akola Apmc Election Agrowon
ताज्या बातम्या

Akola APMC Election : अकोल्यात सहकार पॅनेलची सत्ता कायम

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघात सहकार पॅनेलने सातही जागांवर विजय मिळवला.

Team Agrowon

Akola APMC Election जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) अकोला, अकोट, बार्शीटाकळी या तीन बाजार समित्यांमध्ये मतदान (Voting) झाले. या ठिकाणी अकोल्यात सहकार पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले. सभापती शिरीष धोत्रे यांच्या नेतृत्वातील पॅनेलने यश मिळवले.

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघात सहकार पॅनेलने सातही जागांवर विजय मिळवला. शिरीष धोत्रे, भरत काळमेघ, ज्ञानेश्वर महल्ले, अभिमन्यू वक्टे, सचिन वाकोडे, राजेश बेले, रामेश्वर वाघमारे यांचा विजय झाला.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात विकास पागृत, वैभव माहोरे विजयी झाले. आर्थिक दुर्बल संघात संजय गावंडे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीत दिनकर वाघ, व्यापारी अडते मतदार संघात राजीव शर्मा व चंद्रशेखर खेडकर विजयी झाले.

बार्शीटाकळीला काँग्रेस, भाजप, शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या शेतकरी संघर्ष पॅनेलने १५ जागा जिंकल्या. तीन जागांवर वंचित प्रणीत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये महादेव साबे, रमेश बेटकर, अशोक इंगळे, सुरेश शेंडे, अनिलकुमार राऊत, गोवर्धन सोनटक्के, प्रभाकर खांबलकर हे सर्वसाधारण गटात विजयी झाले.

हमाल मापाडी गटात शे अजहर शे जमीर, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती गटात गोपाळराव कटाळे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात अशोक उत्तमराव कोहर, कल्पना नितीन जाधव, सेवा सहकारी संस्था-निराधिसूचित भटक्या जमाती गटात अशोक हिरासिंग राठोड, इतर मागासवर्गीय गटात महादेव काकड, सेवा सहकारी संस्था महिला गटातून मंगला रमेश गोळे, गंगाबाई गोपाळराव सोनटक्के यांचा विजय झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT