Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Soybean : गडहिंग्लज तालुक्यात सोयाबीनवर तांबेरा

गडहिंग्लज तालुक्यात या वर्षी उन्हाळ सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले गेले. परंतु त्याचा परिणाम खरिपातील सोयाबीनवर तांबेरा पडण्यात झाला आहे.

टीम ॲग्रोवन

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यात या वर्षी उन्हाळ सोयाबीनचे उत्पादन (Summer Soybean Production) मोठ्या प्रमाणात घेतले गेले. परंतु त्याचा परिणाम खरिपातील सोयाबीनवर तांबेरा (Rust Disease On Soybean) पडण्यात झाला आहे. पाने खाणाऱ्या अळींचीही सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. वारंवार पिकांचे निरीक्षण करून औषध फवारणीचे नियोजन करण्यासही कृषी विभागाकडून (Agriculture Department) सांगितले जात आहे.

उन्हाळ सोयाबीन उत्पादनामुळे खरिपातील सोयाबीन पिकावर तांबेरा येत असल्याने काही वर्षांपासून तालुक्यात उन्हाळ सोयाबीन उत्पादन घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु गतवर्षी चांगला दर मिळाल्याने यंदा उन्हाळ्यात एक हजार हेक्टरवर सोयाबीनचे उत्पादन घेतले गेले. त्याच क्षेत्रात खरिपाचे सोयाबीन असेल तर तांबेरा पडण्याचा धोका अधिक आहे. अगाप पेरणी झालेल्या सोयाबीनवर काही भागांत आता तांबेऱ्याचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षी ऑगस्टमध्ये किडीचा प्रादुर्भाव जाणवत असे. यंदा याच कालावधीत मोठ्या प्रमाणात कीड नसली तरी त्याची सुरुवात झाली आहे. या वर्षी जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची लागवड उशिरा झाली. परिणामी, यापुढे पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करून ऊन-पावसाच्या अंदाजावर औषध फवारणीचे नियोजन करण्याची गरज आहे.

भात पिकाला आवश्यक त्या वेळी पावसाने दडी मारल्याने त्याच्या वाढीवर परिणाम झाला. माळरानावरील भाताला कमी पावसाचा फटका बसला आहे. त्याची वाढ खुंटली असून खडकाळ जमिनीतील भात आताच्या उन्हाने वाळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT