Rajmata Jijau Credit Society Agrowon
ताज्या बातम्या

राजमाता जिजाऊ पतसंस्थेत सात कोटी ३७ लाखांचा अपहार

संस्थेचा विश्‍वासघात करून अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १४) संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, कर्मचारी व तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
राहुरी, जि. नगर ः राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत ( Rajmata Jijau Credit Society) सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्ठ्याहत्तर रुपये निधीचा संस्थेचा विश्‍वासघात, फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १४) संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, कर्मचारी व तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कारभारी बापूसाहेब फाटक (व्यवस्थापक, रा. टाकळीमियाँ), भाऊसाहेब तुकाराम येवले (चेअरमन, रा. राहुरी), शरद लक्ष्मण निमसे (व्हाइस चेअरमन, रा.सह्याद्री नर्सरी, अस्तगाव, ता. राहाता), सुनील नारायण भोंगळ (लेखनिक तथा वसुली अधिकारी तथा दैनिक बचत प्रतिनिधी, रा. जोगेश्‍वरी आखाडा), उत्तम दत्तात्रेय तारडे (लेखनिक तथा कॉम्प्युटर ऑपरेटर, रा. केंदळ बुद्रुक), सुरेखा संदीप सांगळे (लेखनिक तथा कॅशिअर, रा. राहुरी), सुरेश मंजाबापू पवार (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा. जोगेश्‍वरी आखाडा), दत्तात्रेय विठ्ठल बोंबले (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा. सावेडी, अहमदनगर), दीपक संपतराव बंगाळ (तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक, रा. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक संजय पांडू धनवडे (वय ३७, रा. सोनई) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान कालावधीच्या लेखापरीक्षणात राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्ठ्याहत्तर रुपये निधीचा संस्थेचा विश्‍वासघात, फसवणूक करून अपहार झाला आहे. त्यात वरील नऊ आरोपी सहभागी आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत. दरम्यान, ठेवीदारांचे पैसे अडकल्याने संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्ध ठेवीदारांनी राहुरीच्या सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयासमोर आंदोलने करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र

Sugarcane Harvesting: ऊस तोडणीसाठी वेळेचे नियोजन

Rabi Season: रब्बी हंगामात संवर्धित शेती पद्धती फायद्याची

Bogus Onion Seed: बोगस कांदा बियाण्यांचा फटका; शेतकऱ्यांची पोलिसांत धाव

Indian Politics: मौनं सर्वार्थ साधनम् !

SCROLL FOR NEXT