Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’साठी चार कोटींची मदत

सातारा जिल्ह्यातील ९१३ मृत जनावरांसाठी मदत

Team Agrowon

सातारा : जनावरांच्या लम्पी स्कीन आजाराने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात राज्यात सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

आजअखेर जिल्ह्यातील ९१३ मृत जनावरांच्या मदतीपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन कोटी ४० लाख रक्कम जमा झाल्या आहेत. राज्य शासनाकडून ‘लम्पी स्कीन’च्या नियंत्रणासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही आला होता.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना लम्पी स्कीनच्या संसर्गाने घेरले होते. हा आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना राबविल्याने मागील काही दिवसांत हा आजार आटोक्यात आला आहे.

लसीकरणही १०० टक्के पूर्ण झाल्याने संसर्गाच्या फैलावाला आळा बसला आहे. लम्पी स्कीनचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दुधाळ जनावरे ३० हजार, बैल २५ हजार, तर एका वर्षाखालील पशुधनास १६ हजार मदत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यात एक हजार १९९ बाधित जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील आजअखेर ९१३ मृत जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत.

दरम्यान, सद्यःस्थितीत जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने चार किंवा पाच जनावरे आढळत आहे. राज्यात लम्पी स्कीन नियंत्रणात आणण्यात सातारा जिल्ह्याला यश आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी आढावा घेत जिल्हास्तरावर सूचनाही केल्या होत्या.


जनावरांचा लम्पी स्कीन आजार नियंत्रणात आहे. या आजाराने मृत जनावरांच्या मदतीपोटी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी नियोजन केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे.

उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच अर्थसाह्य केले जाईल. पशुधन सुरक्षित राहण्यासाठी ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ अभियान मोहीम राबविण्यात येत आहे.
- ज्ञानेश्‍वर खिलारी : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT