Panand road  Agrowon
ताज्या बातम्या

Panand Road : शेत-पाणंद रस्त्यांसाठी १५ कोटींचा निधी

शिरपुरात ६४ शेत-पाणंद रस्त्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून १५ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Team Agrowon


शिरपूर, जि. धुळे : शिरपुरात ६४ शेत-पाणंद (Farm panand Road) रस्त्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून १५ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतील सहमती प्रदान कामांची यादी २३ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यात शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी एक किमी लांबीच्या शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये अशा ६४ रस्त्यांसाठी १५ कोटी ३६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार पटेल व आमदार पावरा यांनी शासनाकडे मागणी नोंदवून कामास निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता.
या गावांना मिळेल फायदा

शेत-पाणंद रस्ते मंजूर झालेल्या गावांमध्ये जळोद (उखळवाडी) साठी एक, जळोद (उखळवाडी) साठी दुसरा रस्ता, अर्थे खुर्द, बलकुवेसह मुखेड, नवे भामपूर, हिसाळे, अजंदे खुर्द, निमझरी, जुने भामपूर, हिंगोणी, करवंद, वरझडी, शिंगावे, कळमसरे, उमरदा, वकवाड, अंतुर्ली, तऱ्हाडी, जवखेडा, वरुळ, तोंदे, तरडी, भावेर, बुडकी, टेंभेपाडा, न्यू बोराडी, रोहिणी, आंबे, हिवरखेडा, ताजपुरी, थाळनेर, दहिवद, लौकी, सांगवी एक, सांगवी दुसरा रस्ता, खंबाळे, जातोडे, टेंभे, चांदपुरी, बाभुळदे, सुभाष नगर, वाडी बुद्रुक, वाडी खुर्द, घोडसगाव, होळ, भोरटेक, मांजरोद, फत्तेपूर फॉरेस्ट एक, फत्तेपूर फॉरेस्ट दुसरा रस्ता, बोराडीसाठी एक, बोराडीसाठी दुसरा रस्ता, उंटावद, खर्दे बुद्रुक, वाठोडे, पिळोदा, जापोरा, कुवे, थाळनेर, शिंगावे, अजंदे खुर्द, टेंभे, सुभाष नगर, वाघाडी, भाटपुरा यांचा समावेश आहे.

सातत्याने पाठपुरावा करून शेत-पाणंद रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे या कामांमध्ये प्रथम दर्जाची गुणवत्ता अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांनी त्याकडे लक्ष घालावे. ग्रामपंचायत, शेतकरी व ग्रामस्थ यांनीदेखील जागरूक राहून रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होण्याबाबत दक्षता घ्यावी.
- अमरिश पटेल, आमदार


गुणवत्तेकडे कटाक्ष
मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतील रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत अशी ताकीद आमदार अमरिशभाई पटेल यांनी संबंधितांना दिली आहे. शेतकऱ्यांना आपापल्या शेतापर्यंत ये-जा करता यावी यादृष्टीने हे रस्ते महत्त्वाचे आहेत. ते पावसाळ्यातही शाबूत राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीच तडजोड करू नये, असे निर्देश आमदार पटेल यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lasunghas cultivation: पौष्टिक लसूणघास चारा पिकाचे लागवड तंत्र

Winter Cow Care: हिवाळ्यातील संकरित गाईंच्या आरोग्याचे व्यवस्थापन

Solar Irrigation: वीज नसली तरी द्या पिकांना पाणी; सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायद्याची

Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू

India Urea Plant in Russia: रशियात भारताचा पहिला युरिया प्रकल्प, चीनच्या निर्यात निर्बंधांनंतर उचलले मोठे पाऊल

SCROLL FOR NEXT