PDKV AKOLA  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Research : ‘पंदेकृवि’त येत्या १० वर्षांचा कृषी संशोधनाचा ‘रोडमॅप’

PDKV Akola News : सध्या वातावरण बदलाच्या काळात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य आव्हाने उभी आहेत. दरवर्षी यात वाढच होत आहे.

Team Agrowon

Akola News : ‘‘सध्या वातावरण बदलाच्या (Climate Change) काळात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य आव्हाने उभी आहेत. दरवर्षी यात वाढच होत आहे.

त्यामुळे काळसुसंगत संशोधनाच्या (Agriculture Research) अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (PDKV Akola) येत्या १० वर्षांचा संशोधनाचा ‘रोडमॅप’ बनविला आहे.

त्यावर कार्यवाही सुरू झाली असून, संशोधक त्यादृष्टीने कामालाही लागले आहेत,’’ असे कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना सांगितले.

डॉ. गडाख यांनी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सप्टेंबर २०२२ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून बरेच बदल हातात घेतले आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामुख्याने स्थिर झालेली यंत्रणा आता चालायला लागली आहे. कुलगुरू हे स्वतः विद्यापीठाच्या प्रत्येक प्रक्षेत्राला भेटी देऊन आढावा घेत आहेत.

विद्यापीठाचे प्रत्येक संशोधन केंद्र, केव्हीके, कृषी विद्यालये, महाविद्यालये अशा सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी कामकाजाची माहिती जाणून घेतली आहे. शेतकरी आणि शास्त्रज्ञांमध्ये संवाद वाढविण्यावर विद्यापीठाने जोर दिला आहे.

यासाठी प्रमुख पिकांमध्ये प्रयोगशीलता जोपासणाऱ्या शेतकरी व शास्त्रज्ञांचे मंच तयार केले आहेत. अशा स्वरूपाचे ४८ मंच बनविण्यात आले आहेत.

दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी या मंचातील सदस्यांची बैठक होऊन त्यामध्ये चर्चा घडवून आणली जाते.

याला संबंधित पिकांचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ उपस्थित राहतात. ते शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत, त्यांची गरज काय आहे, याची माहिती घेतात.

त्याचा उपयोग येत्या काळात संशोधनाच्या कार्यासाठी करून घेतला जाणार आहे. आजवर पाच महिन्यांत या बैठका झाल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम समोर येत आहेत.

शेतकरी आपापल्या पिकांबाबत मते मांडत आहेत. त्यात आता विद्यापीठाच्या काळसुसंगत संशोधन कार्याला गती देण्यासाठी गेल्याच महिन्यात एक रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

...असा आहे रोडमॅप

- हवामान बदलाच्या काळात आज शेतकऱ्यांना हवे असलेले वाण, यंत्र, तंत्र तयार करण्यासाठी दिशा देणार

- विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू

- विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून शेतीत प्रयोगशीलता जोपासणाऱ्या शेतकऱ्यांचा आयडॉल म्हणून होणार सन्मान

- विदर्भात विद्यापीठाच्या संशोधन केंद्र, शाळा, महाविद्यालय परिसरात शेतकऱ्यांचे फलक झळकविणार

- दोन महिन्यांतून एकदा एका शेतकऱ्याला व कृषी उद्योजकाला मान मिळू लागला

- विद्यापीठ संलग्न संस्थांत विद्यापीठ निर्मित सर्व उत्पादने मिळणार

विद्यापीठ टाकतेय कात

नवीन कुलगुरू रुजू झाल्यापासून त्यांचे कार्यालय सकाळीच सुरू होते. सकाळपासूनच ते विविध प्रक्षेत्रावर भेटी देतात.

कार्यालयीन कामकाजासोबतच प्रत्यक्ष फिल्डवरील कामांवर त्यांचा अधिक जोर आहे. त्यामुळे संबंधित विभागांना आता नव्या शैलीनुसार कामकाजाला प्राधान्य द्यावे लागत आहेत.

विद्यापीठाची शेकडो हेक्टर जमीन ही पडून असते. आता यातील अधिकाधिक जमीन वापरात आणण्याचे काम सुरु झाले आहे.

जेथे शक्य असेल, तेथे पीक, फळबाग लागवडीवर जोर दिला जात आहे. संशोधनालाही दिशा दिली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT