Road Security
Road Security  Agrowon
ताज्या बातम्या

Road Security : ‘रस्ता सुरक्षा अभियान लोकचळवळ व्हावी’

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : ‘‘महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे.

वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यातून रस्ता सुरक्षा अभियान (Road Safety Campaign) हे सप्ताहापुरतेच मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावी,’’

असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे (Manisha Avhale) यांनी केले.

३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हे अभियान राबविण्यात येत आहे. ते १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

अपर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलिस उपायुक्त दीपाली काळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर आणि अमरसिंह गवारे, प्रदीप चिटणीस, संजय नवले उपस्थित होते.

आव्हाळे म्हणाल्या, ‘‘अपघातामुळे जीवितहानी होण्याबरोबरच संबंधित कुटुंबावरही परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी.

वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या माध्यमातून नागरिकांकडून रस्ते सुरक्षा अभियान वर्षभर राबविले गेले पाहिजे.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT