Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पिकांना पावसाचा दिलासा

Nagar Rain Update : पाथर्डी, नेवासा, जामखेड, कर्जत, नेवासा तालुक्यांतील ५० पेक्षा अधिक महसुल मंडलांत पावसाची चांगली हजेरी लागली.

Team Agrowon

Nagar Monsoon News : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २५) दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत झालेल्या भीज पावसाने खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. पाथर्डी, नेवासा, जामखेड, कर्जत, नेवासा तालुक्यांतील ५० पेक्षा अधिक महसुल मंडलांत पावसाची चांगली हजेरी लागली. पाणलोटातील जोरदार पावसाने भंडारदऱ्यातून विसर्ग सुरु आहे. त्यामुळे निळवंडेत वेगाने पाणीसाठा होत आहे. मुळा धरणातही पाण्याची चांगली आवक होत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर भीज पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरु होता. खरिपाच्या बहुतांश पिकाला यामुळे जीवदान मिळाले. कापूस, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, मूग, उडदाला हा पाऊस लाभदायक ठरला.

अकोले तालुक्यातील रतनवाडीत बुधवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांत १२७ मिलिमीटर, घाटघरला १२३, पांजरे येथे १०६, भंडारदरा ६३, तर वाकी येथे ४९ मिलिमीटर पाऊस झाला. भंडारदरा धरणातून विसर्ग सोडला जात आहे.

बुधवारी सकाळी १० वाजता धरणातून ७ हजार २०९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे निळवंडेचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे. सकाळी १० वाजता निळवंडे धरण ५०.२२ टक्के भरले. धरणात कोतूळजवळ ९ हजार १५५ क्युसेकने पाणी येत असल्याने मुळाचा पाणीसाठा ५६ टक्के झाला.

नाशिकमधील पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात ७ हजार १९० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे दौंड पुलाजवळ भीमा नदीतून २७ हजार ६५६ क्युसेकने पाणी वाहत आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २४ तासांतील पाऊस (मिलिमीटर)

नालेगाव ः २४, सावेडी ः १७, कापूरवाडी ः ३१, केडगाव ः २४, भिंगार ः २४, नागापूर, ः १५, जेऊर ः १८, चिचोंडी ः २५, वाळकी ः २२, रुईछत्तीशी ः २३, भाळवणी ः २४, सुपाः २१, निघोज ः २८, श्रीगोंदा ः ३४, काष्टी ः १८, मांडवगण ः २३, बेलवंडी ः ३९, पेंडगाव ः २३,

चिंभळा ः २३, देवदैठण ः २४, कोळगाव ः ३६, कर्जत ः २८, राशीन ः ३९, भांबोरा ः २०, कोंभळी ः २४, मिरजगाव ः २८, माही ः २८, जामखेड ः ४०, अरणगाव ः २८, खर्डा ः ४७, नान्नज ः २५, नायगाव ः ५१, शेवगाव ः २९, बोधेगाव ः ३३, चापडगाव ः २७, ढोरजळगाव ः २५, एरंडगाव ः २३, पाथर्डी ः २६, माणिकदौडी ः २६, टाकळी ः३७, कोरडगाव ः ३०, करंजी ः १९, मिरी ः ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT