Irshalwadi Landslide Agrowon
ताज्या बातम्या

Irshalwadi Landslide : आक्रोश आणि फक्त आक्रोश..., ढिगाऱ्याखाली दबलेल्या इर्शालवाडीत आश्रुंचा पूर

Irshalwadi Rescue Operation: इर्शाळवाडीवर दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली दबलं गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजूनही घटनास्थळी पाऊस चालू असल्यामुळे एनडीआरएफच्या बचाव पथकांना मदतकार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Team Agrowon

Raigad Khalapur Irshalgad Landslide Live Update: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत बुधवारी रात्री दरड कोसळून किमान ४० ते ५० घरं गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास  १०३ लोकांना वाचवण्यात यश आहे. पण १६ जणांचा मृत्यू झाला. ५० हून अधिक बेपत्ता असून एनडीआरएफकडून बचाव सुरू आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीतले लोक झोपेत असताना गावावर दरड कोसळली. यात गावातील ४८ कुटुंबांमधील २२९ लोकांवर संकट कोसळले. काहींनी यातून कसाबसा जीव वाचवला, परंतु शेकडो आदिवासी या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले. घटनेची माहिती मिळातच शासनाकडून बचाव कार्य सुरू झाले आहे.  

स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआर एफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू आहे.  या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेनरची व्यवस्था करण्यात येत असून या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT