Farmer Loan Waive Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Loan Waive : प्रोत्साहन अनुदान पात्रतेच्या जाचक अटी रद्द करा

‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको केला. या वेळी अक्षय पाटील, दीपक पाटील आदींनी शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानाकरीता घातलेल्या जाचक अटींचा समाचार घेतला.

टीम ॲग्रोवन

शिरोळ, जि. कोल्हापूर ः महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांच्या अनुदानास (Incentive Grant), पात्रतेसाठीच्या जाचक अटी रद्द करून सरसकट अनुदान न दिल्यास एक जुलैला येथील सहायक निबंधकांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला. (Farmer Loan Waive)

‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको केला. या वेळी अक्षय पाटील, दीपक पाटील आदींनी शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानाकरीता घातलेल्या जाचक अटींचा समाचार घेतला. नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. तथापि त्यामध्ये असलेल्या काही जाचक अटींमुळे शिरोळ तालुक्यातील पाच टक्के शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार नाही. २०१९ च्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पत राखण्याकरीता शेतकऱ्यांनी उसनवार पैसे घेऊन पीककर्जाची जुनी-नवी प्रकरणे केली आहेत. यामुळे तत्काळ जाचक अटी मागे घ्याव्यात, अशी मागणी केली.

धनाजी चुडमुंगे म्हणाले, ‘शासनाने शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची भूमिका घ्यावी. नोकरशाहीमुळे जाचक अटी परिपत्रकात घातल्या असतील, तर त्या तत्काळ मागे घ्याव्यात. त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात येत आहे. जाचक अटी मागे न घेतल्यास १ जुलै रोजी येथील सहायक निबंधकाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल.’

दरम्यान, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना याबाबतचे निवेदन दिले. ‘आंदोलन अंकुश’चे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णा देशमुख, महेश जाधव, धैर्यशील पाटील, शशिकांत काळे, सुनील चुडमुंगे, दीपक माने, अरुण साळोखे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT