Radhakrishna Vikhe-Patil Agrowon
ताज्या बातम्या

Solapur News : उद्योगवाढीतील अडथळे जिल्हास्तरावर दूर करा

Team Agrowon

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी (Business Growth) पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योजक, व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांमधील धोरणात्मक बाबीसंबंधी शासनस्तरावर पाठपुरावा करू.

तसेच स्थानिक अडथळे जिल्हास्तरावर प्रशासनाने दूर करावेत,’’ अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी दिल्या.

जिल्ह्याचा सर्वंकष विकास करण्याची ग्वाही दिल्यानंतर, त्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत विखे-पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांची बैठक व चर्चासत्र घेतले.

आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, उद्योजक नितीन बिज्जरगी, चिंचोळी ‘एमआयडीसी’चे अध्यक्ष राम रेड्डी, उद्योजक अभिजित टाकळीकर, जयेश पटेल आदी उपस्थित होते.

उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील एक एक प्रश्‍न मार्गी लावू, अशी ग्वाही देत विखे-पाटील यांनी कुशल कामगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी तसेच, अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

‘क्रेडाई’चे अध्यक्ष जिद्दीमणी म्हणाले, ‘‘सोलापूर शहरामध्ये जर एखादी मिळकत भाडेतत्त्वावर द्यायची असल्यास ६४ टक्क्यांपर्यंत रेंट टॅक्स द्यावा लागतो.

हा टॅक्स कमी होण्याची गरज आहे.’’ त्यावर विखे-पाटील यांनी तुलनात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन त्यानंतर आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने प्रयत्न करून सोलापुरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रदर्शन केंद्राची उभारणी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राजू राठी यांनी प्रास्ताविक केले. नितीन बिज्जरगी यांनी आभार मानले.

‘आयटी हबसाठी प्रस्ताव द्या

‘‘सोलापूर शहर-जिल्ह्याच्या विकासासाठी चिंचोळी एमआयडीसीला महत्त्व आहे. या एमआयडीसीच्या उपलब्ध इमारतीमध्ये आयटी हब सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा. त्याला मंजुरी मिळवून तो सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू,’’ असे आश्‍वासन विखे-पाटील यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT