Seed Industry
Seed Industry Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Crop : रब्बीतील पिकांची बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी

टीम ॲग्रोवन

परभणी ः यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात परभणी येथील विभागीय बीज प्रमाणीकरण (Seed Certification) कार्यालयांतर्गत सहा जिल्ह्यांतील ५ हजार १८१ बीजोत्पादकांनी (Seed Producer) ७ हजार ५४३.३३ हेक्टरवरील पिकांची नोंदणी (Crop Registration) केली आहे.

महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा,अकोला अंतर्गत परभणी विभागीय बीजप्रमाणीकरण कार्यालया अंतर्गंत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेत असलेले शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक या प्रमाणित तसेच पायाभूत बियाण्याच्या उत्पादनासाठी नोंदणी करतात.

यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई या प्रमुख पिकांसह अन्य पिकांची मिळून एकूण ५ हजार १८१ बीजोत्पादकांनी एकूण ७ हजार ५४३.३३ हेक्टरवरील पिकांची नोंदणी केली आहे. त्यात पायाभूत बियाणे उत्पादनासाठी ४७२ बीजोत्पादकांनी ६८७.०६ हेक्टर आणि प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी ४ हजार ७०९ बीजोत्पादकांनी ६ हजार ८५६.२७ हेक्टरवरील पिकांची नोंदणी केली.

त्यात हरभऱ्याची ४ हजार ४६१ बीजोत्पादकांनी ६ हजार ६५२.१९ हेक्टर, ज्वारीची ३९४ बीजोत्पादकांनी ४०४ हेक्टर, गव्हाची २२ बीजोत्पादकांनी ३५.९ हेक्टर, करडईची २५४ बीजोत्पादकांनी ३६३.४४ हेक्टर आणि इतर पिकांसाठी ५० बीजोत्पादकांनी ८७.८ हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली आहे. गतवर्षी (२०२१-२२) एकूण ५ हजार ५८२ बीजोत्पादकांनी ७ हजार ८६६.८६ हेक्टरवरील पिकांची नोंदणी केली होती, असे सूत्रांनी सांगितले.

बीजप्रमाणीकरण स्थिती (हेक्टरमध्ये)

जिल्हा बीजोत्पादक क्षेत्र

परभणी २१७४ ३२३८

नांदेड ४४१ ७६०

लातूर १५६३ २१८२

उस्मानाबाद १००३ १३६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनास हवामान अनुकूल

Fodder Shortage : हिरव्यागार उसाची चाऱ्यासाठी तोड

Pomegranate Farming : प्रशिक्षित स्थानिक मजुरांमुळे डाळिंब उत्पादकांचा खर्च वाचला

Rain Update : उंबर्डे, भुईबावडा परिसराला पावसाने पुन्हा झोडपले

Mango Season : आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सपुंष्टात

SCROLL FOR NEXT