Satbara Utara Online Apply : घरातील वडीलधारी व्यक्तीचे निधन झाल्यानंतर वारसाची नोंद त्यांच्या अपत्यांच्या नावावर केली जाते. दरम्यान शेती नावावर करण्यासाठी सरकारी पायऱ्या झिजवाव्या लागतात. या सर्व प्रक्रीयेत वारस नोंद करण्यासाठी खूप विलंब होतो. दरम्यान सरकारने यावर आता एक पर्याय काढला आहे.
सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यावर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तलाठी आणि सर्कल लॉगीनला नोंदीसाठी जाते. शासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेमध्ये तलाठी आणि सर्कलनी मंजूर केल्यानंतर वारस नोंद सातबारा उताऱ्यावर होत आहे.
यामुळे पूर्वी तलाठी सर्कल यांची भेट घेऊन वारसा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात अर्ज करावा लागायचा. यामध्ये तलाठी भेटेल याची शाश्वती नसायची. यात होणारा वेळ वाचवण्यासाठी सरकारकडून ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. यामुळे पैशाचा होणारा गैरव्यवहारही काही प्रमाणात थांबणार आहे.
वारस ऑनलाइन नोंदविण्यासाठी काय कराल ?
https/pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे.
'पब्लिक डेटा एन्ट्री' हे पेज उघडावे.
संबंधित पेजवर गेल्यानंतर प्रासिड टू लॉगिन करून आधी स्वतःचे खाते उघडावे व नंतर वारस नोंदीसाठी अर्ज करावा.
याबाबत गुंठेवारी संघर्ष समितीचे चंदन चव्हाण म्हणाले की, घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर वारस नोंदीसाठी वारसदारांना वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होत होता. तरी देखील लवकर काम होत नव्हते. आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे संबंधितांना सोईचे ठरणार आहे. या नव्या सुविधेचा संबंधितांनी लाभ घ्यावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.