Sugarcane Transport Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Transport : ‘ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टरची मोहीम राबवावी’

रिफ्लेक्टिव्ह टेप नसल्यास अपघाताची शक्यता असते. अशा वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले नसल्यास वाहन मालक, चालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

टीम ॲग्रोवन

सांगली ः रस्त्यावरील अपघात (Road Accident) कमी होण्याच्या व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी (Sugarcane Transport) करार केलेल्या वाहनास व बैलगाड्यांना रिफ्लेक्टिव्ह टेप व कापडी बोर्ड छपाई करून लावण्याची मोहीम राबवावी, अशा सूचना उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिल्या.

साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्यांना मागील बाजूस लाल, पुढे पांढरा व दोन्ही बाजूस पिवळा असा अखंड रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे बंधनकारक आहे. रिफ्लेक्टिव्ह टेप नसल्यास अपघाताची शक्यता असते.

अशा वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले नसल्यास वाहन मालक, चालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे ऊस वाहतुकीच्या ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाड्यांना रिफ्लेक्टिव्‍ह टेप व फलक लावण्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सूचना दिल्या होत्या, त्या पाळाव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT