Dam Filled Agrowon
ताज्या बातम्या

Dam Filled : धरणांतील विसर्गात घट जिल्ह्यात पाऊस ओसरला; २१ धरणे शंभर टक्के भरली

पुणे : पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सोडण्यात आलेल्या अनेक धरणांच्या विसर्गात घट केली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सोडण्यात आलेल्या अनेक धरणांच्या विसर्गात (Dam Discharge )घट केली आहे. त्यामुळे नद्यांतील पाण्याच्या पातळी कमी झाली आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा (Water Overflow) प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. धरणातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. आतापर्यंत २१ धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर पाच धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांत ९० टक्केहून अधिक पाण्याचा साठा झाला आहे. मात्र, मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप घेतली आहे.

बुधवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत येडगाव, वडज धरणांचे पाणलोट क्षेत्र वगळता टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, शेटफळ, नाझरे, वीर, चिल्हेवाडी, घोड, डिंभे, विसापूर आणि उजनी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली.

पावसाने उघडीप देण्यास सुरवात केली, त्याप्रमाणे धरणांतील विसर्गात घट करण्यात आली आहे. सध्या घोड धरणातून सांडव्याला सर्वाधिक चार हजार ९६५ क्सुसेकने विसर्ग घोड नदीत सुरू आहे. तर पवना धरणातून विद्युत गृहासाठी एक हजार ५६ क्सुसेकने पवना नदीत, ‘खडकवासला’तून ५०१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला आहे.

आंध्रा धरणातून सांडव्याला ११५ क्युसेकने विसर्ग इंद्रायणी नदीला सोडला आहे. नाझरे धरणातून सांडव्याला १९० क्युसेकने विसर्ग कऱ्हा नदीत सोडला आहे. वीर धरणांतूनही ७०२ क्युसेकने उजव्या कालव्याला विसर्ग सोडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT