Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : या जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा ` रेड अलर्ट`

विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसानं हजेरी लावली. नागपूर जिल्ह्यातील उमरी मंडळात सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नागपूर आणि परसोनी मंडळात प्रत्येकी १०० मिलिमीटर पाऊस झाला.

टीम ॲग्रोवन

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर (Rain Intensity) वाढलाय. सोमवारी पूर्व विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. तर उद्या सकाळपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Rain Forecast) वर्तविण्यात आलाय.

विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसानं हजेरी लावली. नागपूर जिल्ह्यातील उमरी मंडळात सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नागपूर आणि परसोनी मंडळात प्रत्येकी १०० मिलिमीटर पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा मंडळात १६० मिमी., तर इटापल्ली ११० मिमी आणि गडचिरोली येथे १०० मिमी. पाऊस पडला. याशिवाय अमरावती, यवतमाळ, गोंदीया, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये पाऊस झाला. या पावसामुळं पूर्व विदर्भातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी गावांमध्ये शिरले.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोरदार पावसानं झाडपलं. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मंडळांत जोरदार सरी पडल्या. हवामान विभगानं कोकणात जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलाय. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या तिनही जिल्ह्यांतील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही अनेक मंडळात पावसानं हजेरी लावली.

कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतेय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सातारा, जावळी, पाटण, कऱ्हाड, खंडाळा, वाई. महाबळेश्वर, कोरेगाव तालुक्यात पावसाचा जोर वाढला. या तालुक्याच्या बहुतांशी भागात संततधार पाऊस सुरू आहे.

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरादार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही काही भागांत मुसळधार पाऊस झाला. याशिवाय औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा जोर अधिक होता.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलाय. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे तल विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. तसंच सिंधुदुर्ग, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर राज्यातील इतर भागांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT