Organic Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Organic Mission : जैविक मिशनसोबत काम करण्याच्या नावाखाली पदभरतीचा गोरखधंदा

Organic Farming : राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनचा पुढील टप्पा मंजूर करीत संपूर्ण राज्यात राबविण्याचे जाहीर ही झाले आहे.

Team Agrowon

Akola News : राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनचा पुढील टप्पा मंजूर करीत संपूर्ण राज्यात राबविण्याचे जाहीर ही झाले आहे.

अशातच काही खासगी संस्था या संधीचे सोने करण्याच्या मार्गावर लागल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात एका संस्थेने थेट जाहिरात प्रसिद्ध करीत प्रकल्पासाठी विकास अधिकारी, कृषी सहायकांची पदे भरण्यासाठी अर्जच मागवले आहेत.

सध्या सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनने काही जिल्ह्यांत काम करून चळवळ उभी केली आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने काम सुरू होत आहे. याचा गैरफायदा उचलण्यासाठी काही जणांनी फिल्डींग लावली आहे.

जाहिरात प्रसिद्ध करीत विकास अधिकारी पदासाठी १२ ते १८ हजार रुपये पगार आणि कृषी सहायक पदासाठी ७५०० ते १०००० रुपयांचे आमिष दाखवण्यात आले आहे. यासाठी अर्ज मागवत २०० रुपये शुल्क आकारले आहे. विशेष म्हणजे मुलाखतीसुद्धा आयोजित करण्यात आल्या. वास्तविक शासनस्तरावरून कुठल्याही प्रकारे अशी पदे स्वतः शासन किंवा खासगी संस्थांकडून भरण्याबाबत आदेश नसतानाही हा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार अकोल्यात जैविक मिशनच्या अधिकाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर आत्मा प्रकल्प संचालकांसोबत बोलून तातडीने संबंधितांविरुद्ध कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली आहे. आता संबंधित संस्था चालकाकडून सारवासारव सुरू करण्यात आल्याच समजते.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशनअंतर्गत अशा प्रकारची कुठलीही कामे करण्यासाठी खासगी संस्थांमार्फत नोकरभरतीचे प्रयोजन नाही. हा प्रकार फसवा असू शकतो. त्यामुळे कृषी पदवीधरांनी यापासून सावध राहावे. मिशनचा या प्रकाराशी कुठलाही संबंध नाही.
- संतोष आळसे, प्रकल्प संचालक, जैविक शेती मिशन, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT