Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा योजनेत विक्रमी नोंदणी

Crop Insurance Scheme : नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगाम २०२३ साठी पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यात विक्रमी नोंदणी झाली आहे.

Team Agrowon

Satara News : नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगाम २०२३ साठी पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यात विक्रमी नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील दोन लाख ७६ हजार १६५ शेतकरी सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या नऊ पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली होती. या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया विमा हप्ता रक्कम भरावयाचा असून उर्वरित विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे.

या योजनेंतर्गत संरक्षित रकमेची सांगड पिकाच्या आधारभूत किमतीशी घातल्याने संरक्षित रकमेत वाढ झाली आहे. परंतु विमा हप्ता दर दोन टक्के असूनही शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून योजनेमध्ये सहभागी होता आले आहे.

विमा घेण्याचे मुदत संपली असून या योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून योजना सुरू झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे. या योजनेतर्गत गारपीट, भूसख्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, ढगफुटी, चक्रीवादळ अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर निश्चित करण्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे योजनेत वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास वित्तीय संस्थेस (बँकेस) अथवा विमा कंपनीस नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.

एक लाख हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

एक रुपयात सुरू केलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत जास्ती जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. परिणामी विक्रमी नोंदणी झाली आहे. या योजनेत दोन लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतल्याने एक लाख दहा हजार ८२९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT