AJit Pawar  Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : धान खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा

ऑनलाइन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून आहे. तरीही सरकारने कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी केंद्रे बंद केली आहेत.

Team Agrowon

Maharashtra Budget Session 2023 मुंबई : ‘‘ऑनलाइन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून आहे. तरीही सरकारने कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी (Paddy Procurement) केंद्रे बंद केली आहेत. त्यामुळे धान उत्पादक (Paddy Farmer) अडचणीत आले आहेत.

त्यामुळे सरकारने तातडीने राज्यातील सर्व धान खरेदी केंद्रे सुरू करावीत,’’ अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. धान खरेदी केंद्रे बंद असल्याचा मुद्दा पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला.

पवार म्हणाले,‘‘ऑनलाइन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असताना शासनाने ३१ जानेवारी २०२३ पासून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील भात खरेदी केंद्र कल्पना न देता अचानक बंद केली आहेत.

त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना कमी दरात भात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष आहे.’’

‘‘पालघरप्रमाणेच कोकण, विदर्भ व राज्यातील इतर भागांत भात खरेदी केंद्रे अचानक बंद केली आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार विभागीय कार्यालया अंतर्गत १५ हजार शेतकऱ्यांची धान खरेदी अद्यापही प्रलंबित आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगाव सेंटरची ४०० शेतकऱ्यांची सात हजार क्विंटल भात खरेदी प्रलंबित आहे. माणगाव केंद्रावर अजून १० हजार क्विंटल खरेदी अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने खरेदी केंद्रे स्थापन करावीत,’’ अशी मागणी पवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT