Tomato Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Rate : भाव पडले तेव्हा सरकार कुठे होते? ः तुपकर

Tomato Market Update : टोमॅटोचे दर वाढल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. हा प्रकार शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव पाडण्यासाठी असल्याचा थेट आरोप तुपकर यांनी केला आहे.

Team Agrowon

Akola News : ‘‘सध्या टोमॅटोचे भाव वाढल्याने देशभर कल्लोळ तयार झाला आहे. मात्र याच टोमॅटोचे भाव जेव्हा पडलेले होते, तेव्हा सरकार कुठे होते, असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

ज्यांना या भावात टोमॅटो खाणे शक्य होत नाही, अशा ग्राहकांनी काही दिवस न खाल्ले तरी कुठे बिघडणार आहे,’’ असा प्रश्‍नही त्यांनी शहरी ग्राहकांना केला.

टोमॅटोचे दर वाढल्याने ते नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. हा प्रकार शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव पाडण्यासाठी असल्याचा थेट आरोप तुपकर यांनी केला आहे. गेल्या काळात टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकात जनावरे घातली होती.

लावलेला खर्चही अनेक वेळा निघाला नव्हता. या काळात कुठल्याच सरकारने शेतकऱ्यांना दोन पैशांची मदत केलेली नाही. शेतकऱ्यांनी मदतीसाठी निवेदने दिली होती. त्याची दखलही घेतली गेली नाही.

आता टोमॅटोचे दर वाढताच देशभर हाहाकार उडाल्याचे वातावरण तयार केले जात आहे. केंद्र सरकारही शहरी ग्राहकांची दखल घेत टोमॅटोच्या दरावर नियंत्रणासाठी हस्तक्षेप करण्यास पुढे आले आहे.

दोन पैसे शेतकऱ्याच्या खिशात जात असतील तर कुणाचे पोट दुखण्याचे कारण नसावे. जेव्हा हा पोशिंदा संकटात असतो, त्या वेळी कुणीही त्याच्या पाठीशी उभे राहत नाही, असे तुपकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT