Ration Card Scheme agrowon
ताज्या बातम्या

Ration Card Scheme : आता देशात कुठेही रेशन धान्य मिळणार, काय आहे एक देश एक रेशन कार्ड योजना

Ration Card : केंद्र सरकारकडून 'एक देश एक रेशन कार्ड' योजना आंमलात आणण्याचे काम सुरू केले आहे.

Team Agrowon

Central Government Scheme : केंद्र सरकारकडून 'एक देश एक रेशन कार्ड' योजना आंमलात आणण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत राज्यशासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

याअंतर्गत देशभरातील कोणत्याही रेशन धान्य दुकानात कार्डधारकाला धान्य मिळणार आहे. याचा लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक रेशनकार्ड धारकाला नंबर देण्यात आला आहे. या १२ अंकी नंबर आवश्यक आहे. याचबरोबर कार्डधारकांचे अथवा घरातील कोणाचे दुसऱ्या कोणत्याही रेशन कार्डमध्ये नाव नसावे.

कार्डावर नाव असलेल्यांपैकी एकाचे आधारसिडिंग गरजेचे आहे. याचबरोबर प्रत्येक गावात ई-पॉस मशिन देण्यात आले आहेत. या ई-पॉस मशिनवर संबंधित कार्डधारकाने एकदातरी रेशन घेणे आवश्यक आहे.

याचबरोबर या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून ‘मेरा राशन’ हे अ‍ॅप निर्मीती केली आहे. याअ‍ॅपच्या माध्यमातून लाभार्थ्याला धान्य किती मिळते. याचबरोबर त्याचे जवळचे धान्य दुकान यासह शिधापत्रिकेची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध असते. या अ‍ॅपबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेशही राज्यातील पुरवठा विभागांना देण्यात आले आहेत.

मागच्या काही वर्षांपासून अन्न धान्य योजनेअंतर्गत भारतातील कित्येकांना मोफत धान्य मिळत असते. परंतु कामानिमीत्त लाभार्थी त्यांच्या मूळ पत्त्यापासून लांब राहत असेल तर त्याला धान्याचा लाभ मिळत नाही.

हे धान्य आणण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने अनेकांनी हे धान्यही नाकारल्याचे प्रकार समोर आले आहेत. या योजनेमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नोकरी, व्यवसाय, कामधंद्यानिमित्त तसेच अन्य काही कारणास्तव मूळ वास्तव्य ठिकाणापासून दूर असलेल्या सर्व कार्डधारकांना याचा फायदा होणार आहे. याखेरीज स्थलांतरित, ऊसतोड कामगार, आदिवासी आदींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT