Sugarcane Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Rate : ऊस दरवाढीसाठी ‘रास्ता रोको’, नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखला

उसाला पहिली उचल २५०० रूपये आणि अंतिम बिल ३१०० रुपये देण्याबाबतचा निर्णय जाहीर करावा.

टीम ॲग्रोवन

मंगळवेढा : उसाला (Sugarcane) पहिली उचल २५०० रूपये आणि अंतिम बिल ३१०० रुपये देण्याबाबतचा निर्णय जाहीर करावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Swabhimani Shetkari sanghtna) नागपूर - रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था बराच वेळ विस्कळीत झाली होती.श्रीमंत केदार, रामचंद्र सारवडे, राजकुमार स्वामी, मल्लिकार्जुन भांजे, सचिन चौगुले, अमोगसिध्द काकणकी, रवि गोवे, रवि पुजारी, विकास पुजारी, सज्जन पाटील , गणेश गावकरे, शंकर संगशेट्टी, आबा खांडेकर, शांताप्पा कुंभार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बोलताना स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष ॲड. राहुल घुले म्हणाले की, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून ऊस उत्पादकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

गेली दोन वर्ष कोरोना असल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले नाही. त्यामुळे कारखानदारांनी सांगली व कोल्हापूरपेक्षा एक हजार रुपये ऊस दर कमी दिला. आंदोलनादरम्यान पोलिस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT