Agriculture Department
Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

पणन संचालकपदावरून रसाळ यांना पुन्हा हटविले

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याचे पणन संचालकपद (Marketing Director) विकास रसाळ यांच्यासाठी पुन्हा एकदा औट घटकेचे ठरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विशेष बाब म्हणून करण्यात आलेल्या नियुक्ती रद्द करत, रसाळ यांची पुन्हा त्यांच्या मुळ जागी लोखंड व पोलाद बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली केली आहे. यामुळे आता नवीन पणन संचालकपदी कोणाची नियुक्ती होते याबाबत उत्सुकता आहे. नवीन नावांमध्ये सुधीर तुंगार आणि ज्ञानदेव मुकणे यांच्या नावांची चर्चा आहे.

३० नोव्हेंबर रोजी सुनील पवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर अपर निबंधक विकास रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र एका दिवस काम केल्यानंतर त्याच संध्याकाळी गुरुवारी (ता.१) त्यांची नियुक्ती रद्द केल्याचे आदेश मंत्रालयातून धडकले आणि एका दिवसांचे संचालक पद औट घटकेचे ठरले.

मात्र रसाळ यांनी कोकरे यांच्या नियुक्ती आदेशाला ‘मॅट’मध्ये दाद मागत स्थगिती मिळविली आणि पुन्हा एकदा पणन संचालकांचा पदभार स्वीकारला. मात्र, यानंतर झालेल्या घडामोडींनंतर गुरुवारी (ता.२२) राज्य शासनाने रसाळ यांची बदली त्यांच्या मुळ जागी पोलाद बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर केली.

पणन संचालक हे पद सहकार क्षेत्रातील बिगर सनदी अधिकाऱ्यांनंतरचे सर्वात मोठे पद आहे. हे पद अप्पर आयुक्त विशेष निबंधक श्रेणीतील आहे. सुनील पवार सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद अपर निबंधक पदश्रेणीत आणून यावर विकास रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्य शासनाने त्यांच्याच निर्णयाविरुद्ध निर्णय घेत, रसाळ यांची पुन्हा बदली केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या वादात तिढा कायम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पणन खाते होते. अधिवेशना दरम्यान पणन खाते हे शंभुराज देसाई यांच्याकडे आहे, तर भाजपच्या अतुल सावे यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे. भाजपाच्या मंत्र्यांचे निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, रसाळ यांची नियुक्ती करताना उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांना देखील कल्पना नसल्याचे समजते. यामुळे सरकारमधील विसंवादामुळे पणन संचालकपदाचा तिढा कायम असल्याचे बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT