Raju Shetti agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : ...माझ्या मिश्या पांढऱ्या झाल्या तरी साखर कारखानदार अडचणीत, राजू शेट्टींची मिश्कील टीप्पणी

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या कारखान्याची जीएसटी इतकी दिवस थकू का दिली? सरकारचा आशीर्वाद होता का असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

sandeep Shirguppe

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत त्यांनी राज्य सरकारसह कारखानादारांवर सडकून टीका केली आहे. मला मिश्या यायच्या होत्या त्यावेळीपासून साखर कारखाने अडचणीत असल्याचे ऐकतोय, आता माझ्या मिश्या पांढऱ्या झाल्या तरी हेच ऐकायचे का? अशी मिश्किल टीप्पणी राजू शेट्टी यांनी केली.

उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनी साखर कारखान्यांबाबत कठोर भूमिका घेतल्यावर लगेच दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शासनाला हमी देण्याबाबत निर्णय फिरविला सरकारच्या असल्या आडमुठे धोरणामुळे साखर कारखानदार मोठे झाले अन् शेतकरी संकटात आल्याची टीका शेट्टी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांचे खाजगी कारखाने झाल्याने त्यांना उशिरा का होईना शहाणपणा सुचले. यामुळे त्यांनी साखर कारखान्याच्या थकहमी बाबत योग्य ठाम भूमिका घेतली. कारखान्याच्या कर्जाची हमी शासनाने का घ्यावी? कारखान्यांनी पैसे बुडविले तर ते पैसे सरकारला म्हणजे जनतेला द्यावे लागतात असे सांगताना जर खाजगी कारखाने स्वतः हमीवर कर्ज घेऊन फेडतात मग यांनाच कशाला शासनाची हमी पाहिजे असेही शेट्टी म्हणाले.

या कारखानदारांना कारखाना मोडून खायचा आहे. त्यांचा हेतू स्वच्छ नाही म्हणून त्यांना वारंवार हमी द्यायची वेळ येते असा टोला राजू शेट्टी यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

पंकजा मुंडेंना सरकारचा आशिर्वाद होता का?

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याची जीएसटी इतकी दिवस थकू का दिली असा सवाल करत याला सरकारचा आशीर्वाद होता का असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

यावेळी शेट्टी पुढे म्हणाले की, सध्या आम्ही राजकीय पक्षातील नेत्यांना संघटनेत प्रवेश देणे बंद केले आहे. कच्चा माल आमच्याकडे येतो प्रॉडक्ट होऊन बाहेर पडतो आणि मार्केटमध्ये विकला जातो. आमच्या संघटनेचा वापर फक्त कार्यशाळेसारखा होऊ लागल्याने आता आम्ही कच्चा माल देखील पारखून घेत असल्याची मिश्किल टिप्पणी शेट्टी यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT