Mahanand MIlk Agrowon
ताज्या बातम्या

Mahanand Milk : ‘महानंद’च्या अध्यक्षपदी राजेश परजणे यांची निवड

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) या सहकार व दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश परजणे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Agrowon

नगर ः महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) (Mahanand Milk) या सहकार व दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश परजणे-पाटील (Rajesh Parjane patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदावर रामकृष्ण बांगर (Ramkrushn Bangar) यांना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालक मंडळाची (महानंद) मुंबईतील गोरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षदाच्या निवडी झाल्या. अध्यक्षपदासाठी राजेश परजणे-पाटील यांचा व उपाध्यक्षपदासाठी रामकृष्ण बांगर यांचा एकमेव अर्ज आला

संचालक विनायकराव पाटील, वैभव पिचड यांनी परजणे यांच्या निवडीचा ठराव मांडला. त्यानंतर परजणे व बांगर यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परजणे, बांगर यांचा सत्कार केला. राजेश परजणे हे नगर जिल्ह्यातील नावाजलेल्या गोदावरी खोर नामदेवराव परजणे पाटील कोपरगाव तालुका दूध संघाचे अध्यक्ष आहेत. दूध संघाने सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे ते मेहुणे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

LPG Price Hike Protest: गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Sugarcane Crop Disease: उसावरील चाबूक काणी, गवताळ वाढ रोगाचे नियंत्रण

Summer Groundnut Cultivation: अकोल्यात उन्हाळी भुईमूग लागवड दिलासादायक

Minister Dr. Pankaj Bhoyar: वेतनेतर अनुदान धोरणाचे पुनर्विलोकन करण्याचे प्रस्तावित

SCROLL FOR NEXT