Weather Forecast Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon 2023 : रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाच्या सरी; इतर ठिकाणचं काय?

Maharashtra Weather Forecast : आज कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Maharashtra Weather News : राज्यात माॅन्सून सध्या सक्रीय नाही. तसेच स्थानिक वातावरणीय परिस्थिती पावसासाठी पोषक नाही. यामुळे राज्यात पावसाची उघडीप आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मंगळवारपासून पूर्व विदर्भात पावसाला सुरु होऊ शकते, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली

ईशान्य उत्तर प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडेच आहे. या कमी दाब पट्ट्याे पूर्व टोक बहारिच, सितामढी, किसानगंज ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. सिक्कीम पासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत, तसेच दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे या भागांमध्ये पाऊस पडताना दिसत आहे.

राज्यात आज अनेक भागात पावसाची उघडीप होती. काही ठिकाणी हलक्या सरी होत आहेत. पण बहुतांशी भागांमध्ये ऊन्हाचा चटका होता. अधूनमधून ढगाळ वातावरणही होते. ऊन सावल्यांचा खेळही अनेक भागांमध्ये पाहायला मिळाला. हवामान विभागाने आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींचा अंदाज दिला. तसेच पुढील दोन दिवसा पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT