Rain Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात जोर कायम; कोल्हापुरशी संपर्क तुटला

Sindhudurg Rain Update : पुराच्या पाण्यामुळे घारपी (ता. दोडामार्ग) येथे अडकलेल्या २४ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

Team Agrowon

Sindhudurg Rain News : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून सोमवार (ता. २४) सकाळपासून सरीवर सरी कोसळत आहेत. पुराच्या पाण्यामुळे घारपी (ता. दोडामार्ग) येथे अडकलेल्या २४ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. मांडकुली (ता. गगनबावडा) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे करूळ, भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूरकडे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या सर्व नद्या इशारा पातळीनजीक आहेत. त्यातच हवामान विभागाने २७ जुलैपर्यंत आँरेज अलर्ट दिल्यामुळे जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. रविवारी (ता. २३) दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. संततधार पाऊस आणि काही धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

त्यातच रविवारी रात्रभर मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सकाळपासून त्यात अधिकच भर पडली. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील मालवण शहरातील रस्त्यालगतची घरे आणि दुकानांत रविवारी सायकांळी पाणी शिरले. तेरेखोल नदीच्या पाणीपातळीतदेखील वाढ होत असल्याने बांदा बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता आहे.

तेरेखोल, तिलारी, कर्ली, गडनदी, वाघोटन या सर्व नद्या इशारा पातळीनजीक आहेत. तिलारी आतंरराज्य प्रकल्पातून १६.५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तिलारीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला.

तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील मांडकुली (ता. गगनबावडा) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने करूळ आणि भुईबावडा मार्गाने कोल्हापुरला होणारी वाहतूक ठप्प झाली. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस आहे. त्यामुळे नद्या भरून वाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT