Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Monsoon Rain : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाली असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाली असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. रविवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. येत्या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणात पाण्याची आवक सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

पावसाने जून महिन्यात २३ दिवस चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे अनेक धरणांनी तळ गाठला असून काही धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. यात उजनी धरणांचा समावेश आहे.

या सर्व धरणांची एकूण पाण्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. मात्र, सध्या या धरणांत अवघा १४.५५ टीएमसी म्हणजेच सात टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या तेवीस दिवसांत धरणक्षेत्रात अत्यंत तुटपुंज्या पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती.

राज्यात मॉन्सून दाखल होत असताना कोकण, मराठवाडा, विदर्भासह पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी काही प्रमाणात हलक्या सरी बरसत आहे. परंतु पश्‍चिम पट्ट्यात पावसाच्या जोरदार पाऊस बरसत आहे. खडकवासला धरणाच्या परिसरात ३९ मिलिमीटर पाऊस पडला. तर पवना, कासारसाई या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ३८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

तर चासकमान, भामाआसखेड, आंध्रा, शेटफळ, गुंजवणी, भाटघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, विसापूर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. येडगाव, उजनी, कुंडली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस न पडलेला नाही.

लोणावळा धरणक्षेत्रात ५४ मिलिमीटर, मुळशी ३० मिलिमीटर, वळवण ३८, शिरोटा ३२, ठोकरवाडी ३१ मिलिमीटर पाऊस पडला. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यास डोंगराळ भागातील ओढे, नाले खळाळून वाहण्यास सुरुवात करतील. त्यानंतर धरणांतील पाण्यामध्ये वाढ होईल.

रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणाच्या पाललोट क्षेत्रनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : घोड ८०, टेमघर ३०, वरसगाव २४, पानशेत १९, खडकवासला ३९, पवना ३८, कासारसाई ३८, कळमोडी ३४, चासकमान ६, भामा आसखेड ५, आंध्रा ६, वडीवळे २३, शेटफळ ९, नाझरे २६, गुंजवणी ९, भाटघर ७, निरा देवघर ३५, वीर २०, पिंपळगाव जोगे ३, माणिकडोह ३, वडज २, चिल्हेवाडी ५, विसापूर २.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT