Gurhal Raid Agrowon
ताज्या बातम्या

Jaggery Production : बोरीपार्धीत गुऱ्हाळावर छापा

अन्न व औषध प्रशासनाकडून साखर, गूळ जप्त

टीम ॲग्रोवन

केडगाव, ता. दौंड ः अन्न व औषध प्रशासन विभागाने बोरीपार्धी (ता. दौंड) येथील गुऱ्हाळावर (Sugar Mill) छापा (Raid) टाकून तेथील भेसळीसाठी आणलेली साखर (Sugar)व गूळ जप्त केला आहे, अशी माहिती सहआयुक्त संजय नारागुडे (Sanjay Naragude) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

दौंड तालुक्यातील गूळ उत्पादकांवर सतत कारवाई करूनही वारंवार गूळ उत्पादनात साखरेचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर प्रशासनाकडून गुरुवारी (ता. २९) बोरीपार्धीतील महाराज गूळ उद्योग या गुऱ्हाळावर छापा टाकण्यात आला.

या वेली २८ हजार ८०० रुपयांचा ३२४ किलो गूळ व २२ हजार १०० रुपयांची ६५० किलो साखर जप्त करण्यात आली आहे. कारवाईत घेण्यात आलेले दोन्ही नमुने विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल.

कारवाई दरम्यान तपासणीत आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने गुऱ्हाळ मालकास २० हजार रुपयांचे तडजोड शुल्क इतका दंड आकारण्यात आला आहे.

या बाबतीत प्रशासनास अजूनही तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येईल. गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल.

संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळचालकांनी कायद्यांतर्गत आवश्यक परवाना प्राप्त करून घ्यावेत. सर्व तरतुदींचे पालन करत गूळ उत्पादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुळात भेसळ होत असल्यास माहिती देण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन नारागुडे यांनी केले. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT