rahibai Popere Agrowon
ताज्या बातम्या

Rahibai Popere : अवैध दारू व्यवसायाविरुद्ध राहीबाई पोपेरे यांचा यल्गार

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Illegal Liquor Business नगर : कोंभाळणे हे आदिवासी भागातील (Tribal Area) गाव असूनही गावाने एक पद्मश्री आणि एक महाराष्ट्र केसरी घडवला. गाव महाराष्ट्राचे आणि देशाच्या पटलावर आले.

अवैध दारू विक्रीमुळे (Illegal Liquor Business) गावाचे नाव खराब होण्याची वेळ येऊ लागली. यामुळे आता गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी कोंबड्या गावच्या रहिवासी पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांच्यासह महिलांनी एल्गार पुकारला आणि दारू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर हल्लाबोल केला.

यापुढे गावात अवैध दारू विक्री खपवून घेणार नसल्याचा इशारा या महिलांनी या वेळी दिला.

कोंभाळणे हे अकोले तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील आणि आदिवासी भागातील गाव. देशी बियाण्याचे संवर्धन करणाऱ्या बीज माता राहीबाई पोपेरे यांच्यामुळे हे गाव चर्चेत आले. या वर्षीचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरही याच गावचा आहे.

पोपेरे यांची बीज बँक पाहण्यासाठी देशभरातून लोक येथे येतात. मात्र येथे होत असलेल्या दारू विक्रीमुळे आणि त्याकडे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे व्यसनाधीनतेची संख्या वाढली आणि त्याची नामुष्की गावकऱ्यांवर येत आहे.

अनेक वेळा गावकरी, सामाजिक कार्यकर्ते, महिला एकत्र येऊनही अवैध दारू विक्री बंद झाली नाही. गावाने याबाबत ठराव करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले.

गावची होणारी अधोगती पोपेरे आणि गावातील इतर स्त्रियांना सहन झाली नाही. पोपेरे यांच्या पुढाकाराने हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सुमारे १५० ते २०० महिलांनी अवैध दारू व्यवसायाविरुद्ध एल्गार पुकारला.

‘‘आपले कुंकूच व्यसनांनी संपणार असेल, तर नुसते हळदी-कुंकू करून काय उपयोग? ज्यांच्या नावाने कुंकू लावायचे, तेच व्यसनाने संपणार असतील, तर अवैधपणे दारू व्यवसाय करणारे अड्डे उद्‌ध्वस्त केले पाहिजेत,’’ असे ठरवत सर्व महिलांचे एकमत झाले.

हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत दारू व्यवसाय करणाऱ्या टपऱ्यांवर जोरदार हल्ला चढविण्यात आला.

सर्व महिलांनी देशी दारूच्या बॉटल रस्त्यावर फेकत त्यांचा चुराडा केला. आता गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पोलिस गांभीर्याने घेतील का? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अनेकदा समज देऊनही दारू विक्री थांबली नाही. उलट महिलांची खिल्ली उडवत राजरोजपणे सुरू होता. गावात अनेक विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, अभ्यासक, शास्त्रज्ञ गावरान बियांची बँक पाहण्यासाठी येतात. दारूविक्री होऊ नये म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न करून थकल्यानंतर शेवटचे पाऊल आम्ही उचलले.

- राहीबाई पोपेरे, बीजमाता

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT