Rabi Season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : अमरावती विभागात रब्बी क्षेत्र १६ वर्षांत अडीचवरून सात लाखांवर

सिंचन सुविधात होणारी वाढ त्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक सक्षमतेचा उद्देश अशा विविध कारणांमुळे गेल्या १६ वर्षांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ नोंदविली गेली आहे.

Team Agrowon

अमरावती ः सिंचन सुविधात (Irrigation) होणारी वाढ त्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक सक्षमतेचा उद्देश अशा विविध कारणांमुळे गेल्या १६ वर्षांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत रब्बी (Rabi Season) लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. अडीच लाख हेक्‍टरवरुन हे क्षेत्र ७ लाख २८ हजार हेक्‍टरपर्यंत विस्तारल्याची माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी दिली.

अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश अमरावती विभागात होतो. सिंचन सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांव्दारे पावसाच्या पाण्यावर आधारित पीकपद्धती अंगीकारण्यात आली आहे. पाऊसमान अनिश्चित राहिल्यास जमिनीत पुरेसा ओलावा कायम राहत नाही. परिणामी शेतकरी फार कमी क्षेत्रावर रब्बी पिके घेत होते. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाच्या सोयी आहेत, अशाच बहुतांश शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता.

असे आहे सरासरी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

रब्बी ज्वार १६५८१.०४

गहू १७०७६६.३९

मका १४८१८.८२

हरभरा ५२२४६६.५०

करडई ८५४.६३

जवस ३.०२

तीळ १४२.३३

सूर्यफूल ८७.८०

इतर तेलबिया १५५७.५७

रब्बी पिकांखालील क्षेत्र सातत्याने वाढते असून गेल्या १६ वर्षांत अडीच लाखांवरून ते ७ लाख २८ हजार पर्यंत विस्तारले आहे. सिंचन सुविधांमध्ये झालेली वाढ त्यासोबतच शेतकऱ्यांनी विहिरी, बोअरवेल या माध्यमातूनही सिंचनाच्या सोयी निर्माण केल्या आहेत. शेततळ्यातील पाणी देखील रब्बी पिकांकरिता उपलब्ध केले जाते. या साऱ्यांच्या परिणामी हे क्षेत्र वाढले आहे.- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT