Pune ZP Election Agrowon
ताज्या बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत गट ‘क’ वर्गाची भरती प्रक्रिया सुरू

Pune ZP Recruitment : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या पुणे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट क सवंर्गातील २१ पदांच्या तब्बल १००० जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या पुणे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट क सवंर्गातील २१ पदांच्या तब्बल १००० जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासाठी शनिवारपासून (ता. ५) ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी २०१९ मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र ही भरतीप्रक्रिया मध्यंतरीच स्थगित करण्यात आली. त्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण २० जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती होत आहे. सर्वाधिक नाशिक जिल्हा परिषदेत एक हजार ३८ आणि त्यापाठोपाठ पुणे जिल्हा परिषदेत १ हजार जागांसाठी भरती होणार आहे.

‘आयबीपीएस’ या खासगी यंत्रणेद्वारे ही सर्व प्रक्रिया होत आहे. अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर करावे लागणार आहेत. अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदेत ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज करू नये. तसे केल्यास अर्ज बाद ठरविले जातील. मात्र वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची मुभा आहे.

संकेतस्थळावर माहिती उपलब्ध

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार, तर मागासवर्गीय गटासाठी ९०० रुपये अर्ज शुल्क आहे. अर्ज आणि पदांची सर्व माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जासाठी लिंक: https:ibpsonline.ibps.in/ zpvpiun23/.

साठ हजार उमेदवारांना दिलासा

जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी २०१९ मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी ६० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्कम उमेदवारांना परत केली जाणार आहे.

एवढेच नव्हे, तर या सर्व उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे, अशी माहिती राहुल गावडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT