Pune APMC | APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC Election : पुणे बाजार समिती प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

वीस वर्षांनी होणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. १८ जागांसाठी १७ हजार ४१९ मतदारांचा समावेश यादीत झाला असल्याची माहिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

Team Agrowon

Pune APMC Election पुणे ः वीस वर्षांनी होणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची (Pune APMC Election) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

१८ जागांसाठी १७ हजार ४१९ मतदारांचा (Voter) समावेश यादीत झाला असल्याची माहिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. दोन व्यापार प्रतिनिधी निवडीसाठी १३ हजार १७३ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

१ मार्चपर्यंत या प्रारूप यादीवर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यात येणार अहेत. या आक्षेपांवर १ ते १० मार्च या कालावधीत निर्णय घेण्यात येणार आहे. १५ मार्च रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ एप्रिल रोजी मतदान होऊन, ३० एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत विविध गटातील १८ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १८ पैकी ११ उमेदवार हवेली तालुक्‍यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून निवडले जाणार आहेत.

यासाठी १३४ सोसायटीचे १ हजार ६५५ सदस्य मतदान करणार आहेत. ४ उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत.

यासाठी हवेली तालुक्‍यातील ७१ ग्रामपंचायतीचे ७१३ सदस्य मतदान करणार आहेत. २ व्यापारी प्रतिनिधी आणि १ हमाल, तोलणार प्रतिनिधी असणार आहे.

व्यापार प्रतिनिधींसाठी १३ हजार १७३ जण मतदान करणार आहेत. हमाल, तोलणार प्रतिनिधीसाठी १ हजार ५४९ हमाल आणि ३२९ तोलणार मतदान करणार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे ः २७ मार्च ते ३ एप्रिल

अर्ज छाननी ः ५ एप्रिल

अर्ज मागे घेण्याचा कालावधी ः ६ ते २० एप्रिल

अंतिम यादी, चिन्ह वाटप ः २१ एप्रिल

मतदान ः २९ एप्रिल

मतमोजणी ः ३० एप्रिल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT