Purandar Irrigation Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Purandar Irrigation Scheme : ‘पुरंदर उपसा जलसिंचन’च्या पंप दुरुस्तीला सुरुवात

ही योजना एकूण सहा टप्प्यांत आहे. साधारण १५ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या योजनेच्या पंपहाउसमधील मोटारी, लोखंडी पाइप, व्हॉल्व्ह गंजलेल्या अवस्थेत आहेत.

Team Agrowon

Agriculture Irrigation सासवड : पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे (Purandar Irrigation Scheme) काही पंप नादुरुस्तीमुळे बंद होते. या पंपाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंप बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचण येत होती. आमदार संजय जगताप यांनी कार्यकारी अभियंत्याशी संपर्क करून पंप दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. या प्रमाणे मेकॅनिकल विभागाने पंप दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तालुक्याच्या विकासासाठी वरदायिनी ठरला. ही योजना एकूण सहा टप्प्यांत आहे.

साधारण १५ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या योजनेच्या पंपहाउसमधील मोटारी, लोखंडी पाइप, व्हॉल्व्ह गंजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची गळती होत आले.

ही योजना उन्हाळ्यात सुरू असते. पावसाळा व नंतर किमान सहा महिने ही योजना बंद असते. या काळात देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असते. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार जगताप यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्हॉल्व्ह, मोटार, पाइपची दुरुस्ती सुरू केली आहे. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Kharif Shivar Pheri: कृषी विद्यापीठाच्या खरीप शिवारफेरीला प्रारंभ

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

SCROLL FOR NEXT