Deputy Chief Minister Devendra Fadnavis Agrowon
ताज्या बातम्या

Government Fund : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी १६६.७६ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी बैठकीत प्रस्तावित करण्यात आली.

Team Agrowon

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी (Development Fund) देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतीच दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी सह्याद्री अतिथिगृह येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पुणे विभागाच्या आढाव्यांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या सादरीकरणावेळी ते बोलत होते.

या बैठकीस पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) प्रवरा लोणी (जि. अहमदनगर) येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

तर जिल्हाधिकारी कार्यालय येथून खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, राम सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ साठी शासनाने दिलेल्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ५०२.९५ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

तथापि, सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी १६६.७६ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी बैठकीत प्रस्तावित करण्यात आली.

प्रस्तावित प्रारूप आराखडा तयार करताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवल्याचे सांगून पालकमंत्री विखे पाटील यांनी धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास, महिला व बालविकास, शैक्षणिक क्षेत्राचा विकास, जलसंधारण, उद्योगधंद्यांमध्ये वाढीसाठी उपयुक्त योजनांचा समावेश या बाबींच्या विकासावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणीप्रमाणे भरीव निधी देऊ, असे आश्‍वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rainfall Beed : बीड जिल्ह्यात पावसाचा फटका; कापूस, सोयाबीन, तूर पिकं पाण्याखाली

Agriculture News : इथेनॉलमुळे साखर उद्योग टिकून : नितीन गडकरी

Social Media: समाजमाध्यमे आणि वाढते घटस्फोट

Soybean Market : सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का?

Maharashtra Governor: आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल

SCROLL FOR NEXT