Chhagan Bhujbal agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : शेतीसाठी दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा करा

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा असून सध्या मोठ्या प्रमाणात लागवडीची काम सुरू आहेत. त्यांना सिंचन करण्यासाठी दिवसा पूर्णवेळ वीज उपलब्ध करून द्यावी, तसेच त्यांचे विजेचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, अशा सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या.

टीम ॲग्रोवन

येवला, जि. नाशिक : शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम (Rabi Season) महत्त्वाचा असून सध्या मोठ्या प्रमाणात लागवडीची (Sowing) काम सुरू आहेत. त्यांना सिंचन (Irrigation) करण्यासाठी दिवसा पूर्णवेळ वीज (Daytime Electricity) उपलब्ध करून द्यावी, तसेच त्यांचे विजेचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, अशा सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या.

येवला मतदासंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण शनिवारी (ता. १९) भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार किशोर दराडे, तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुणमामा थोरात, संभाजी पवार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की शेतकऱ्यांचे असलेले विजेचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. शेतकऱ्यांचे वीज जोड तोडण्यात येऊ नयेत, तसेच शेतकऱ्यांनीदेखील शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन टप्प्याटप्प्याने बिल भरावे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT