Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : कृषिपंपासाठी आठ तास वीज द्या

मालनगाव (ता. साक्री) परिसरातील कृषिपंपासाठी आठ तास वीज द्या, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) मालनगाव ते दहिवेल अशी सात किलोमीटर पायपीट करत मोर्चा काढून महावितरणचे लक्ष वेधत निवेदन दिले.

टीम ॲग्रोवन

पिंपळनेर, जि. धुळे : मालनगाव (ता. साक्री) परिसरातील कृषिपंपासाठी (Agriculture Pump) आठ तास वीज (Electricity) द्या, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) मालनगाव ते दहिवेल अशी सात किलोमीटर पायपीट करत मोर्चा काढून महावितरणचे (Mahavitaran) लक्ष वेधत निवेदन दिले. या वेळी शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज दिली जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले.

साक्री तालुका काँग्रेसतर्फे माजी खासदार बापू चौरे व काँग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढला. मालनगाव (ता. साक्री) परिसरातील खरडबारी, बरडीपाडा, बोडकीखडी, सातरपाडा येथील कृषिपंपधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दिवसा फक्त चार तास वीजपुरवठा होतो.

तोही वारंवार खंडित होतो. संबंधित खात्याला जाग यावी यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी मालनगाव ते दहिवेल असा सात किलोमीटर पायपीट करत प्रशसानाचे लक्ष वेधले. मोर्चा दहिवेल येथे पोहोचल्यावर काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी मालनगाव व परिसरातील गावांची समस्या मांडली.

तसेच माजी खासदार बापू चौरे यांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत वीज वितरण कंपनीने पूर्ण वेळ वीज देण्याची मागणी केली. या वेळी माजी सभापती प्रतिभा सूर्यवंशी, एकनाथ गुरव, सभापती शांताराम कुवर, जिल्हा परिषद सदस्य विश्‍वास बागूल, प्रवीण चौरे, सरचिटणीस गणेश गावित, सुक्राम महाले, सुक्राम चौरे, युवराज चौरे, रोहिदास उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?

Pusad APMC: बाजार समितीच्या काट्यावरच शेतकऱ्यांची ‘काटछाट’

Low Fertilizer Farming: कमी खतांमध्ये चांगले उत्पादन कसे घेता येते?

Kharif Crop Planning: पुसद तालुक्यात ७५ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

SCROLL FOR NEXT