Lemon Agrowon
ताज्या बातम्या

Lemon : हस्त बहराचे योग्य नियोजन करणे आवश्‍यक

बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे पुनोती बुद्रुक येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागामार्फत लिंबू हस्तबहार शेतीशाळा घेण्यात आली.

टीम ॲग्रोवन

अकोला ः बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे पुनोती बुद्रुक येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (Agri Technology Management) यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागामार्फत लिंबू हस्तबहार (Lemon Hast Bahar) शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर यांनी शेतकऱ्यांना कागदी लिंबाला फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान चांगली मागणी राहत असल्याने हस्त बहाराचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शाह व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबू हस्तबहार या विषयावर शेतीशाळा घेण्यात आली. सदर शेतीशाळेमध्ये कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ज्ञ गजानन तुपकर यांनी पाणी व्यवस्थापन, फुलोरा अवस्थेत घ्यावयाची काळजी, खत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

श्री. वाशीमकर यांनी पंतप्रधान उन्नयन खाद्य योजना, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अर्चना पेटे, कृषी सहाय्यक एल. व्ही. आंधळे, प्रगतशील शेतकरी गजानन महल्ले व शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT