Natural Farming Agrowon
ताज्या बातम्या

Natural Farming : ‘नाबार्ड’कडून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ‘नाबार्ड’मार्फत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जीवा हा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे.

Team Agrowon

Nanded News : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ‘नाबार्ड’मार्फत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जीवा हा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बाभूळगाव, गंगनबीड (ता. कंधार) येथे विषमुक्त नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक दिलीप दमय्यावार यांनी दिली.=

जीवा प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या एक वर्षात नैसर्गिक शेती ला चालना देण्यात येणार आहे. रासायनिक खतांचा वापर टाळणे, जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढवणे, मिश्र पीक पद्धतीचा वापर, देशी गाईपासून निर्मित निविष्ठांचा वापर व यातून विषमुक्त शेती उत्पादने निर्माण करून उत्पादन खर्च कमी करणे हा मुख्य उद्देश जीवा प्रकल्पाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा प्रारंभ दिलीप दमय्यावार यांच्या हस्ते नुकताच झाला. या वेळी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, सरपंच मुद्रीकाबाई रामदास गीते, जनाबाई राहेरकर, व्यंकटराव राहेरकर, सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. व्यंकट शिंदे, डॉ. कृष्णा अंभुरे आदी उपस्थित होते.

दिलीप दमय्यावार म्हणाले, की संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचे तीन प्रकल्प ‘नाबार्ड’ने हाती घेतले आहेत. त्यापैकी मराठवाड्यातील बाभूळगाव-गंगणबीड हा एकमेव प्रकल्प आहे. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

साधारणपणे ३० एकर क्षेत्रावर देशी बियाण्यांचा वापर करण्यात येणार आहे. या वेळी प्रमोद देशमुख यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले. ग्रामपंचायत सदस्य, संत गुलाबबाबा पाणलोट संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT