Mustard Market Agrowon
ताज्या बातम्या

Mustard Procurement : नाफेडकडून मोहरीची ५ लाख टनांपर्यंत खरेदी

सध्याच्या हंगामात बाजारामध्ये मोहरीची एमएसपीपेक्षा कमी किमंतीत खरेदी होत असल्याने मार्केटमध्ये मोहरीची आवक मंदावली आहे. दरम्यान, नाफेडकडून मोहरीची ५ लाख टनांपर्यंत खरेदी केली आहे

Team Agrowon

NAFED Mustard Procurement : गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील तेल आणि (Oilseeds) तेलबिया बाजारात घसरणीचे सत्र दिसून येत आहे. त्यामुळे मोहरीला एमएसपीपेक्षा कमी दर मिळत असल्याने बाजारात आवक मंदावली आहे.  दरम्यान, नाफेड (NAFED) द्वारे हमी भावावर मोहरीची खरेदी ५ लाख टनाच्या जवळपास पोहोचली आहे.
 
 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) किंमती अजूनही ५ हजार ४५० प्रति क्विंटलच्या MSP च्या खाली आहेत.

चालू रब्बी हंगामात नाफेडने ४ मे पर्यंत, २ हजार ५९९  कोटी किमंतीची ४ लाख ७६ लाख टन मोहरी खरेदी केली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त खरेदी हरियाणा राज्यामध्ये झाली आहे, तिथे नाफेडने ३ लाख ४७ लाख टनपेक्षा जास्त खरेदी केली आहे. मध्य प्रदेशात ७१ हजार ७५९  टन खरेदी झाली. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये ३४ हजार ९८० टन, तर गुजरातमध्ये २३ हजार ०२८ टन खरेदी झाली.

मागील वर्षी – २०२२-२३ च्या रब्बी  हंगामात, बाजारभाव MSP पेक्षा जास्त असल्यामुळे मोहरीची नाफेडकडून खरेदी झाली नाही. कापूस, मका आणि तेलबिया (मोहरी आणि भुईमूग) खरेदी करण्यासाठी सरकार तेव्हाच पाऊल टाकते. जेव्हा त्यांच्या किमती MSP च्या खाली असतात. गहू आणि तांदळाच्या बाबतीत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी केंद्र सरकारकडून खरेदी केली जाते.

आयग्रेन इंडियाचे राहुल चौहान म्हणाले की, सध्याच्या हंगामात, खरेदी प्रक्रिया सुरू असतानाही, एपीएमसी मार्केटमधील आवक मंदावली आहे. कारण दर एमएसपीपेक्षा कमी आहेत. मोठमोठे शेतकरी अधिक भावाच्या अपेक्षेने मोहरी बाजारात आणत नाहीत. “दररोज बाजारातील आवक मंदावली आहे असे दिसते, त्यामुळे दर किंचित स्थिर झाले आहेत, ते गेल्या तीन दिवसांत सुमारे १०० रुपये प्रति क्विंटलने वाढल्या आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात दैनंदिन बाजारात आवक प्रत्येकी ५० किलोच्या ७ ते ८ लाख पिशव्यांदरम्यान होती, तर एप्रिलमध्ये ती १३.५ लाख पोती होती. खाद्यतेलाच्या क्षेत्रातील मंदीमुळे भाव पुढे कमजोर राहतील अशी अपेक्षा आहे, असेही चौहान यांनी सांगितले.

तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीत घट झाल्यानंतर सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्सनी खाद्यतेलाच्या किमती कमी केल्याने मोहरीच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताने 2022-23 मधील हंगामात 128,18 लाख टन मोहरीचे विक्रमी उत्पादन घेतले. मागील वर्षीच्या 119.63 लाख टनांच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढले आहे. 2014-15 पासून मोहरीचे उत्पादन दुप्पट झाले आहे, तेव्हा ते 62.82 लाख टन होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Status: पशुसंवर्धन व्यवसायाला प्राप्तिकरातून सूट मिळणार?

Maharashtra Rain Alert: राज्यात जोरदार पावसाचा इशारा

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT