Edible Oil Prices agrowon
ताज्या बातम्या

Edible Oil Prices : सणासुदीत खाद्यतेलाचे भाव वाढणार? कमी पावसाने सोयाबीन पिकावर परिणाम

Edible Oil : आंतरराष्ट्रीय बाजारातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. परंतु कमी पावसामुळे देशातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसू शकते.

sandeep Shirguppe

Central Government : भारतात ऑगस्टपासून सणासुदीच्या कार्यक्रमांना सुरूवात होते. या पार्श्वभूमिवर सरकारकडून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असतो. दरम्यान रोजच्या जेवणात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. परंतु भविष्यात दर वाढण्याची शक्यता आहे.

फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. परंतु कमी पावसामुळे देशातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसू शकते. असे असले तरी खाद्यतेल कंपन्यांच्या दरात वाढ होणार नसल्याची माहिती तेल कंपन्यांकडून देण्यात आली.

मात्र, सणासुदीच्या हंगामानंतर खाद्यतेलाचे दर या वर्षी डिसेंबर ते पुढील वर्षी एप्रिल-मार्चपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ज्या देशांमध्ये सोयाबीन, सूर्यफुलाचे उत्पादन कमी झाले आहे त्या देशांत खाद्यतेलाच्या किंमती वाढ होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक अंगशु मल्लिक यांच्या म्हणण्यानुसार, मागच्या काही काळात भारताकडून खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या किंमती वाढणार नाहीत. परंतु अपुऱ्या मान्सूनमुळे सोयाबीन पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सोया तेलाचे दर वाढू शकतात. सध्या तेलाचे भाव स्थिर राहणार असल्याचे मत मल्लिक यांनी व्यक्त केले.

कमी पावसाचा पिकांवर परिणाम

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जून, जुलै ऑगस्टमध्ये भारतातील ७१७ पैकी २८७ जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे या राज्यात सोयाबीन, भातासह इतर काही पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

यामुळे यंदा नोव्हेंबरनंतर अचानक तेलाच्या किंमती तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंवर अधिक पैसे मोजावे लागतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT