Silk Farming Agrowon
ताज्या बातम्या

Reshim Sheti : ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये पहिल्यांदाच रेशीम शेतीचे सादरीकरण

Sericulture : राज्यात रेशीम शेतीचा विस्तार होत असतानाच याच्या विद्यापीठ प्रक्षेत्रावर चाचण्या होत अपेक्षित शिफारशी शेतकऱ्यांना मिळाव्यात याकरिता प्रयत्न केला जाणार आहे.

Team Agrowon

Nagpur News : राज्यात रेशीम शेतीचा विस्तार होत असतानाच याच्या विद्यापीठ प्रक्षेत्रावर चाचण्या होत अपेक्षित शिफारशी शेतकऱ्यांना मिळाव्यात याकरिता प्रयत्न केला जाणार आहे.

त्याअंतर्गत पहिल्यांदाच रेशीम शेतीचा लेखाजोखा आणि वाटचाल याविषयीचे सादरीकरण कृषी विद्यापीठाच्या संयुक्‍त संशोधन परिषदेत गुरुवारी (ता. २५) होणार आहे.

रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे हे सादरीकरण करणार असून, त्याकरिता त्यांना वीस मिनिटांचा वेळ निश्‍चित करण्यात आला आहे.

रेशीम शेतीच्या परंपरागत राज्यांसोबतच महाराष्ट्राने अपारंपरिक राज्य म्हणून गेल्या काही वर्षांत दमदार कामगिरी केली आहे. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थकारणच बदलून गेले आहे. त्यामुळेच राज्यात रेशीम शेतीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाची उभारणीही होत आहे.

मात्र येत्या काळात हा व्यवसाय अधिक तंत्रशुद्धपणे व्हावा, त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळावी याकरिता कृषी विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठांनी आपल्या प्रक्षेत्रावर तुती लागवड करून त्याआधारे इतर पिकांच्या धर्तीवर पूरक शिफारशी कराव्यात, अशी अपेक्षा आहे.

तुती लागवड असलेल्या भागात आंतरपिकाची शिफारस आहे. परंतु नेमकी कोणती पिके यात आंतरपीक म्हणून फायदेशीर ठरतील, याविषयी संशोधन झालेले नाही. यासह इतर मुद्यांवरही संशोधनात्मक शिफारशी असाव्यात, असे अपेक्षित आहे. त्याकरिता पहिल्यांदाच रेशीम शेती संदर्भात संयुक्‍त संशोधन परिषदेत सादरीकरण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT