Bamboo Processing Agrowon
ताज्या बातम्या

Ayurvedic Products : ‘फाली’ संमेलनात बांबू, आवळा, आयुर्वेदीय उत्पादने सादरीकरण

Bamboo Farming : जैन हिल्सवर आयोजित ‘फाली’ संमेलनाच्या तिसऱ्या टप्प्यात आकाश मैदानावर विद्यार्थ्यांनी ३१ नावीन्यपूर्ण संशोधन व व्यावसायिक तयारीचे सादरीकरण केले.

Team Agrowon

Jalgaon News : जैन हिल्सवर आयोजित ‘फाली’ संमेलनाच्या तिसऱ्या टप्प्यात आकाश मैदानावर विद्यार्थ्यांनी ३१ नावीन्यपूर्ण संशोधन व व्यावसायिक तयारीचे सादरीकरण केले. यात बायोडिझेल फॉर्म, स्पिरुलिना शेती, बांबू शेती व त्याची उत्पादने, मूल्यसाखळी आदींचा समावेश राहिला.

या संमेलनाचा शुक्रवारी (ता. ९) समारोप झाला. या वेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, ‘फाली’च्या संचालिका नॅन्सी बॅरी यांच्यासह प्रायोजक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आवळा शेती आणि त्याची अन्य उत्पादने, आयुर्वेदीय शेती, केळीचा खजिना, मधमाशी पालनातून मधाचे संकलन, कापडनिर्मिती, एकात्मिक शेती, चिया सीड फार्मिंग, नारळाच्या करवंटीपासून शोभेच्या वस्तू, मिरची पावडर व लोणचे, शेवगा पाने, सेंद्रिय गूळ पेढा, धूप अगरबत्ती उत्पादन, मनुका तयार करणे, कढीपत्त्याची चटणी व अन्य उत्पादने, बीट उत्पादन, तृणधान्यापासून कुरकुरे, भाजी व फळे निर्जलीकरण आदी नावीन्यपूर्ण प्रकारांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. रूचिता तोटे, क्षितिजा कुंभार, गुंजन चौधरी, सुप्रिया जिते या ‘फाली’च्या विद्यार्थ्यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

‘बिझनेस प्लॅन’मधील विजेते

हर्ब रिच बनाना-नव महाराष्ट्र विद्यालय (पांढरे, जि. पुणे) (प्रथम), कर्मवीर फिंगर क्रंची स्नॅक्स-कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (ऐतवडे, जि. सांगली) (द्वितीय), ब्रूम ग्रास फार्मिंग ॲण्ड ब्रूम प्रॉडक्शन-वसंतराव नाईक हायस्कूल (जरूड, जि. अमरावती) (तृतीय), जादुई पेरू सोमेश्‍वर विद्यालय, (अंजनगाव, जि. पुणे) (चतुर्थ), सेंद्रिय गूळ पेढा-श्री. निगमानंद विद्यालय (तळणेवाडी, जि. बीड) पाचवा.

‘इन्होव्हेशन’ स्पर्धेतील विजेते

द्राक्ष फवारणी मॉडेल- न्यू इंग्लिश स्कूल (रिधोरे, जि. सोलापूर) (प्रथम), स्मार्ट इरिगेशन सिस्टिम्स-प्रभात हायस्कूल (पुसला, जि. अमरावती) (द्वितीय), ट्रान्सप्लान्टिंग मशिन- श्री संत मुक्ताबाई विद्यालय (शेलगाव, जि. पुणे) (तृतीय), न्यू फार्मिंग सिक्युरिटी- न्यू इंग्लिश गर्ल स्कूल (मलकापूर, जि. बुलडाणा (चतुर्थ), कर्मवीर चाळणी यंत्र-अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (सातारा) (पाचवा) हे विजेते ठरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT